न्यूमोनिया - Nimai Hospital
न्यूमोनिया

न्यूमोनिया

न्यूमोनिया

न्यूमोनिया हा श्वसन संस्थेचा आजार आहे. न्यूमोनिया हा जंतूमुळे पसरणारा संसर्गजन्य आजार आहे. न्यूमोनिया फुफ्फुसाच्या काही भागातच होतो. या जंतूमुळे श्वासनलिकेला व फुफ्फुसाला सूज येते त्यामुळे वेदनाही होऊ शकतात. न्यूमोनिया हा अचानक येणारा कमी कालावधीचा तीव्र आजार आहे व उपचार न केल्यास जीवघेणा ठरू शकतो. न्यूमोनिया हा आजार कोणालाही होऊ शकतो. पण पाच वर्षाखालील मुलांमध्ये न्युमोनियाचे प्रमाण जास्त आढळते व भारतामध्ये बरीच मुले या आजाराने दगावतात.

आजाराची लक्षणे

पाच वर्षाखालील मुलामुलीमध्ये छाती उडते व त्याचबरोबर ताप असल्यास न्यूमोनियाची शक्यता जास्त असते. लहान मुलांना श्वास घेताना त्रास होतो. आईचे दूध नीट ओढता येत नाही.

उपचार

न्यूमोनिया हा गंभीर आजार असल्यामुळे योग्य त्या डॉक्टरांकडून उपचार होणे आवश्यक असते. वरीलपैकी काहीही लक्षणे आढळल्यास त्वरीत डॉक्टरांकडे जावे. त्यामुळे लवकरात लवकर उपचार सुरु होऊन तीव्रता (गंभीरता) कमी होऊ शकते.

Spread the love

Nimai Hospitals
Typically replies within an hour

Nimai Hospitals
Hi there 👋

How can I help you?
×
Chat with Us