हँड फूट माउथ डिसीज (HFMD) - Nimai Hospital
हँड फूट माउथ डिसीज (HFMD)

हँड फूट माउथ डिसीज (HFMD)

लहानांना होणारा हँड फूट माउथ डिसीज (HFMD)

ऑक्टोबर हिट संपूण हिवाळा सुरु झाला आणि विषाणूजन्य आजार त्यांचं तोंड वर काढू लागली, या दिवसांमध्ये पसरणारे व सारखे असणारे दोन सामान्य आजार म्हणजे

१. कांजण्या व २. लहानांना होणारा हँड फूट माउथ डिसीज (HFMD)

दोघांमधील सामान लक्षणे –

  • ताप येणे
  • अंग दुखणे
  • चिडचिड होणे

दोघांमधील भिन्न लक्षण

  • कांजण्याची पुरळ हि सामान्यतः अगोदर छाती – पोटावर व पाटीवर येतात व नंतर चेहरा, हात पायावर पसरते
  • हँड फूट माउथ डिसीज (HFMD) पायावर, हातावर, तोंडामध्ये व नितंबावर छोट्या पाण्याने भरलेल्या पुळ्या येतात

या आजाराचं नाव आहे, ‘एचएफएमडी’ अर्थात ‘हँड फूट माऊथ डीसिज’. त्याचीच माहिती आपण या लेखात घेऊयात.

आजाराचे कारण

हा एचएफएमडीचा आजार ‘एन्टरोव्हायरस’ कुटुंबातल्या विषाणूंमुळे होतो. ‘ कॉक्सॅकी व्हायरस’, ‘इकोव्हायरस’ आणि ‘एन्टरोव्हायरस’ अशा या व्हायरसच्या पोटजाती आहेत.

आजार कसा होतो

हा आजार झालेल्या मुलाच्या संपर्कात आलं असता, शिंकांमधून, खोकल्यातून हे व्हायरस पसरू शकतात. आजारी व्यक्तीनं वापरलेल्या वस्तू जसं की, रूमाल, टॉवेल वगैरे दुसऱ्या मुलांसाठी वापरल्यामुळेही हा आजार पसरू शकतो.

हा आजार कोणाला होतो

जरी साधारणतः हा आजार पाच वर्षांच्या आतल्या मुलांना होत असला तरी मोठ्या मुलांना व प्रौढांना देखील हा आजार होऊ शकतो जर त्यांची प्रतिकार शक्ती कमी असेल तर

या आजाराची लक्षणे काय आहेत

या आजाराचे विषाणू शरीरात शिरल्यापासून पाच ते सहा दिवसात आजाराची लक्षणं दिसू लागतात. पहिले दोन-तीन दिवस थोडा ताप येतो.

सर्दी-खोकलाही थोड्या प्रमाणात होऊ शकतो.मग हातापायावर पुळ्या दिसू लागतात.तळपायावर आणि तळहातावरही लालसर पुळ्या येतात. या पुळ्यांना थोडी खाजही येते. या पुळ्यांमुळे लहान बाळांना काहीशी बेचैनी येते आणि ती किरकिरी होतात.सर्वांत त्रासदायक बाब म्हणजे, या आजारात लहान मुलांच्या घशात लालसर पुळ्या येतात. त्यामुळे घसा खूप दुखतो आणि खाऊ खाताना, गिळताना त्यांना खूप त्रास होतो. भीतीनं मुलं खाणं सोडतात आणि मुलं तसंच त्यांचे पालकही हैराण होतात.

साधारणपणे पाच ते सहा दिवस या पुळ्या अंगावर राहतात. या पुळ्या काहींना थोड्या प्रमाणात येतात; तर काहींना खूप जास्त प्रमाणात आणि आकारानं मोठ्या येतात. थोड्या दिवसांत त्या कोरड्या होतात आणि त्यावर खपल्या धरतात. दहा-बारा दिवसांत पुळ्या पूर्णपणे जातात आणि त्याचे व्रण वगैरे काहीच राहात नाही.

तसा हा फारसा गंभीर आजार नाही. त्रासदायक मात्र आहे. काही थोड्या मुलांमुळे या पुळ्यांमध्येच ‘बॅक्टेरिअल इन्फेक्शन’ होऊन पू-युक्त फोड होऊ शकतात. अगदी क्वचित काही मुलांमध्ये या विषाणूमुळे मेंदूच्या आवरणाला सूज येऊन ‘एसेप्टिक मेनिनजायटिस’ किंवा ‘एनोफॅलायटिस’ यासारखे गंभीर अवस्थेचे आजारही उद्भवू शकतात.

हँड फूट माउथ डिसीज (HFMD) वरील उपचार

या आजाराविरूद्ध कोणतंही नेमकं व्हायरसविरोधी औषध उपलब्ध नाही. त्यामुळे त्या-त्या मुलातल्या लक्षणानुसार उपचार करावे लागतात. उदा, तापासाठी औषध, खाज कमी करायचं औषध, घशाला बरं वाटावं म्हणून औषध इ. प्रतिजैविकांचा या आजारात फारसा काहीही उपयोग नाही. (पुळ्यांमध्ये जर पू-युक्त फोड झाले तरच क्वचित प्रसंगी प्रतिजैविकं द्यावी लागतात)

हा आजार झालेल्या मुलाला नेहमीप्रमाणे आंघोळ घालावी तसेच पुळ्या स्वच्छ राहतील, याची काळजी घ्यावी.

खायला नेहमीचा आहार द्यायला हरकत नाही. घशात फोड आलेले असतील तर मात्र सगळे पदार्थ मऊ करूनच मुलांना द्यावेत. या आजारात मुलांच्या मागे लागूनच त्यांना खाऊ घालावं लागतं.

हँड फूट माउथ डिसीज (HFMD) वरील प्रतिबंध

या आजाराच्या विषाणूंविरूद्ध कोणतीही लस उपलब्ध नाही. परंतू, हा आजार फारसा गंभीर नसल्यामुळे कुणीही जास्त घाबरून जाण्याचीही गरज नाही. हा आजार संक्रमणशील असल्याने ज्याला आजार झाला आहे त्याला इतर लहान मुलांपासून दूर ठेवणे, आजारी मुलांना शाळेत न पाठवणे व शिक्षकांनी अश्या मुलांना शाळेत न युई देणे.

अधिक माहितीसाठी संपर्क

डॉ. संतोष एन. मद्रेवार

बालरोग व नवजात शिशु तज्ज्ञ

निमाई हॉस्पिटल्स

हडको / बजाज नगर, औरंगाबाद

Spread the love

Nimai Hospitals
Typically replies within an hour

Nimai Hospitals
Hi there 👋

How can I help you?
×
Chat with Us